मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

नयनरम्य गगनबावडा

नयनरम्य गगनबावडा गगनबावडा !!! नावला शोभेल अस गगनात मावेल एवढे सौन्दर्य.  पावसाळ्याला नुकतीच सुरुवात झाली असल्यामुळे निसर्ग कसा प्रसन्न आणि हिरवागार झाला आहे. मी स्वता: भटकंती वेडी असल्यामुळे वातावरणात घरात काही माझे पाय  शांत बसु देत न्हवते. पण जायच कुठे?? ठिकाण शक्यतो जवळ पाहिजे म्हणजे एका दिवसाच ट्रेकिंग व्हाव.  मग बरेच पर्याय बघून कोल्हापुर पासून एकदम जवळ असे निसर्गरम्य गगनबावडा हे ठिकान नक्की केले.  जायचे कसे: गगनबावडा हे कोल्हापुर पासून एकदम जवळ. कोल्हापुर मधून ST बस च्या भरपूर गाड्या आहेत. रंकाला बस स्टॅंड वरुन बस सुटतात। कोल्हापुर पासून गगनबावडा 58 किमी अंतर आहे. पहायचे काय: नीरव शांतता , रान वेली , झाडे , प्राणी , उंच डोंगर , खोल दरया , नागमोडी घाट , डोंगरातले शुभ्र धबधबे। मनसोक्त भटकंती ज्याला करायची आहे त्याने अवश्य इकडे यावे.  गगनगिरी महाराजांचा मठ बघण्यासारखा आहे.  आम्ही रविवार , १ जुलाई २०१८ ला जायच नक्की केले.  रंकाला बस स्टॅंड वरुन कोल्हापुर-गगनबावडा बस पकडली।  चला या वर्षीच्या भटकंती ला सु...

म...... म...... मराठीचा......

म...... म...... मराठीचा......  ५ जुलै २०१८ माझी लेक ३ वर्षाची होतेय।  साहजिकच आम्ही आता तिच्या वाढत्या आणि खेलत्या वयाबरोबर तिच्या शिक्षणाचा श्रीगणेशा करायची वेळ. आम्ही तिला या वर्षापासून शाळेत घालायचा निर्णय घेतला.  आमची इच्छा की तिचे प्राथमिक  शिक्षण मराठी माध्यमातून व्हावे आणि माफक अपेक्षा होती की अशी शाळा असावी जिथे छान छान गाणी , श्लोक , अंकगणित ओळख  , खेळणे , बागडने अस  प्राथमिक शिकवले जाईल।  मग १ - २  दिवस ऑफिस मधुन सुट्टी घेवून या मायभूमित मराठी शाळा शोधण्याचा आम्ही घाट घातला। सुरुवातीला आम्हाला जास्त करुन इंग्रजी माध्यमाच्या शाळा दिसु लागल्या. आता जागतिकीकरणाने जग एवढे जवळ आले आहे की दूसरी भाषा शिकणे गरजेचे बनले आहे. असो, आम्ही आमचा शोध चालूच ठेवला  होता. जवळपास दिवस संपत आला तरी काही मराठी बालवाड़ी सापडत नव्हती।  जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत पण त्या पहिलीपासून।  मग आम्ही विचार केला चला इंग्रजी माध्यमाच्या शाळा मधे सेमी - इंग्रजी हा प्रकार आहे तो तरी बघू या. अस म्हणुन आम्ही एका शाळेत गेलो।  शाळा...

बेडसे लेणी....कलंदर कलाकारांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीचा रसरशीत अविष्कार.

बेडसे लेणी.... कलंदर कलाकारांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीचा रसरशीत अविष्कार. बेडसे लेणी म्हणजे खरच   कलंदर कलाकारांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीचा रसरशीत अविष्कार. अतिशय सुंदर आणि रेखीव लेणी बघुन मनाला खुप छान वाटत।  पुणे- मुंबई महामार्गावरील कामशेतहून पवना धरणाकडे  बेडसे  हे छोटे  गाव लागते.   नेहमीच्या सहलींच्या वर्दळीपासून दूर एकांतात पहूडलेलं हे बौध्दकालीन लेणं कामशेतपासून जवळच ८-१० कि.मी. अंतरावर आहे. कामशेत रेल्वे स्टेशनपासून पुणे-मुंबई रस्त्यावर आल्यावर एस.टी. किंवा खाजगी वाहनाने पवनानगर(काळे कॉलनी) येथे जाणार्‍या रस्त्याने राऊतवाडी येथे उतरावे. डोंगराच्या मध्यावर असलेली बेडसे लेणी लक्ष वेधून घेतात. अत्यंत शांत सुरम्य निवांत असं हे ठिकाण. येथुन मावळ खोर्‍याचे विस्तीर्ण दर्शन होते. आकाशात घुसलेली तुंग, तिकोना किल्ल्यांची शिखरे साद घालतात. कलंदर कलाकारांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीचा रसरशीत अविष्कार इथं पहायला मिळतो. इ.स. पूर्व २०० ते ५०० च्या काळातील हे शिल्प सौंदर्य आहे. आम्ही आमच्या ऑफिस ट्रीप ला  पवना धरण बघायला गेलो होतो आणि अचा...
साखलोली अविस्मरणीय सहल। ........   एक सुंदर सफ़र ....  जायचे कसे : पुणे - कात्रज - भोर - महड - दापोली - मुरुड - साखलोली। पहायचे काय : मुरुड बीच , हर्णे बंदर , कर्दे बीच आणि कोकणातील रम्य सृष्टि। ..... २३ नवम्बर २०१३ रोजी सकाळी ६.०० वाजता आमची सवारी पुण्यातून निघाली. सकाळची थंड हवा आणि मनातली खुप दिवसाची इच्छा घेवून आम्ही कोकणाकडे प्रस्थान केले  सकाळी ६. ०० वाजता साळुंखे विहार वरुन मी आणि हणमंत निघालो।  हणमंत चा मित्र अनिल आणि त्याची बायको अमिता आम्हाला घ्यायला आले होते।  मस्त अशी सहल चालू झाली। साळुंखे विहार वरुन निघालो ते सरळ चिंचवड ला. तेथून मनिषा ला घेवून कात्रज मार्गे पुण्यातून बाहेर पडलो।  आमच्या गाडीला भुकेची जाणीव झाली  होती आणी मग काय सुरू झाली पेट्रोल शोधायची मोहीम।  चिंचवड मधून बाहेर पडल्यापासून आम्ही सगळे पंप शोधत होतो पन तो काही सापडायला तयार नव्हता।  शेवटी अस वाटायला लागल की आता आपल्याला गाड़ी थांबवून पायपीठ करायला लागते की काय। ……। पण कात्रज च्या नवीन बोगदयातून बाहेर पडल्यावर शिंदेवाड़ी च्या जवळ एक पेट...