मुख्य सामग्रीवर वगळा

पुस्तकाचे नाव - सत्तरीचे बोल

पुस्तकाचे नाव - सत्तरीचे बोल 

लेखक- डॉ. पी. एस. रामाणी 


जगातील सर्वोत्तम दहा न्यूरोस्पायनल सर्जना पैकी एक डॉ. पी. एस. रामाणी . गोव्यातील एका खेडेगावात वाढलेले आणि अपार कष्ट , सातत्य याने यशाला गवसणी घालणारे  डॉ. रामाणी यांनी लिहलेले "सत्तरीचे बोल" हे पुस्तक सत्तरीत असणाऱ्या साठीच नव्हे तर आताच्या धकाधकीच्या जीवनात तिशी चाळिशीत लागू होण्यासारखे आहे.

अलीकडे आपण रोज बातम्या ऐकतो तरुणांना तिशीतच हार्ट अटॅक , मधुमेह , उच्च रक्तदाब या सारखे आजार जडतात. याच मूळ कारण रोजच्या सवयींमध्ये असतं.  डॉ. रामाणी म्हणतात शरीर संवर्धनासाठी वेळीच लक्ष दिल तर साठीतही माणसाचा पाठीचा कणा ताठ राहु शकतो . साठीच वय नाठीच नसून तल्लख बुद्धीच द्योतक असत. 

आपल्याला जीवनावर प्रेम करायला हे पुस्तक शिकवत.  डॉ. रामाणी एके ठिकाणी म्हणतात, आपल्याला हे जीवन न मागता मिळालेले आहे. पुस्तकात एके ठिकाणी मनाच्या हिमतीबद्दल सांगताना ते लोकमान्य टिळकांचं उदाहरण देतात. इंग्लंड मध्ये  चिरोल खटला हरल्यानंतर कुणीतरी त्यांना बोललं, आता सार आभाळ कोसळलं. टिळक शांतपणे त्यावर उत्तरले, हरकत नाही त्या कोसळलेल्या आकाशाच्याच एकाद्या तुकड्यावर उभा राहून मी इंग्रजी सत्तेविरुद्ध झुंज देईन. माणसाची हिम्मत कशी असावी याच हे सर्वोत्तम उदाहरणं.

पुस्तकातून  डॉ.रामाणी आपल्याला सकाळी लवकर उठण्याची जादू सांगतात. खरं तर माझ्या आयुष्यात ही जादू मी रोज अनुभवते. मी स्वतः पहाटे ४.३० ला दिवसाची सुरुवात करते, आणि खरंच ती वेळ मन प्रसन्न करणारी असते. पुस्तक वाचताना माझ्या या सवयीला एक नवी पुष्टी मिळाली.

पुस्तकाच्या शेवटच्या दोन भागात आपल्याला आहार आणि व्यायाम याच मार्गदर्शन  डॉ. रामाणी करतात. हे पुस्तक संग्रही ठेवून  डॉ. रामाणी यांनी दिलेल्या मार्गदर्शनाचा वापर केल्यास आयुष्य प्रसन्न आणि दीर्घायुषी होईल यात शंका नाही.

Insta@readersbookcafe 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुस्तक समीक्षा - ३/१८/२/२६- लमाण

पुस्तक समीक्षा - ३/१७/२/२६ पुस्तकाचे नाव - लमाण  लेखक - डॉक्टर . श्रीराम लागू  प्रकाशक - @popularprakashan  गेल्या काही दिवसापूर्वी लमाण वाचुन पूर्ण झाले. हे केवळ एक पुस्तक नसुन  डॉ.श्रीराम लागू यांनी आपल्या आयुष्याचा विस्तृत जीवनपट वाचकासमोर ठेवलेला आहे. पुस्तक वाचतांना तो डोळ्यासमोरून झरझर निघुन जातो.  आम्ही नट म्हणजे नुसते लमाण. इकडचा माल तिकडे नेऊन टाकणारे' हे शिरवाडकरांचे वाक्य पुस्तकाच्या सुरुवातीलाच वाचायला मिळते.  आपल्या एवढ्या दीर्घ आयुष्यात श्रीराम लागूंनी बरेच काही करुन ठेवले आहे.  मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतला, मराठी रंगमंचावरचा एक नट हा लागूंचा फक्त एक चेहरा झाला. यापलिकडे एक सशक्त निर्माता व दिग्दर्शक, एक चांगला वाचक व अभ्यासक, प्रायोगिक रंगभूमीवरचा एक प्रज्ञावंत कलाकार आणि सामाजिक तळमळ असलेला एक सच्चा माणूस असे लागूंचे अनेक चेहरे 'लमाण' वाचल्यानंतर ध्यानात येतात.  हे पुस्तक श्रीराम लागू यांनी दोन भागात मांडले आहे. १.त्यांचे वैयक्तिक आयुष्य, शिक्षण, डॉक्टरकीचा व्यवसाय आणि नाटकप्रेम.  २.व्यावसायिक रंगभूमीवरचे आयुष्य. सुरुवातीच्या ...

पुस्तकाचे नाव - "कितने गाजी आए कितने गाजी गए" (Kitne Ghazi Aaye Kitne Ghazi Gaye)

  पुस्तकाचे नाव -  "कितने गाजी आए कितने गाजी गए"  ( Kitne Ghazi Aaye Kitne Ghazi Gaye) Life Story of  Lt Gen . K . J . S . "Tiny " Dhillon (Retd ) किंमत - ४३८ रुपये  'Kitne Ghazi Aaye, Kitne Ghazi Gaye' (कितने गाज़ी आए, कितने गाज़ी गए) हे Lt Gen . K . J . S . "Tiny " Dhillon (Retd ) यांच्या आत्मचरित्रावर आधारित पुस्तक आहे, ज्यात त्यांच्या काश्मीरमधील ४० वर्षांच्या कारकिर्दीतील दहशतवादविरोधी संघर्ष,  कश्मीरी पंडितांचे स्थलांतर त्यामागील सत्य आणि  गैरसमज स्पष्ट केले आहेत.   पुलवामा हल्ला -  ४० सीआरपीएफ जवानांच्या शहीद होण्यामागील घटनांची माहिती ,  बालाकोट हवाई हल्ल्याचे  तपशील,  कलम ३७०  हटवल्यानंतर काश्मीरमधील सामाजिक, राजकीय आणि कायद्याच्या परिस्थितीवर झालेला परिणाम हे मुद्दे मांडले आहेत . त्यांचा नॅशनल डिफेन्स अकॅडेमी (NDA ) मधून सुरु झालेला प्रवास, राजपुताना रायफल्स मधील दिवस , General Bipin Rawat Sir , Mahendra Singh Dhoni यांच्याबद्दल या व्यक्तिचरित्रात लिहलं आहे . तसेच हे पुस्तक सैन्यातील सैनिकाच्या वैयक्तिक, व्य...

पुस्तक समीक्षा - बेटावरचे ते दोघे

  पुस्तक समीक्षा १/५/२/२६  पुस्तकाचे नाव - बेटावरचे ते दोघे  लेखक - समर  बेटावरचे ते दोघे या पुस्तकात मुख्यतः दोन कथा आहेत . १. बेटावरचे ते दोघे (Fantasy Fiction - कल्पनारम्य / जादुई कथा ) २. स्मृतिविप्लव (Science Fiction - विज्ञान कथा) पहिली कथा आपल्याला कल्पनेच्या जगात नेते. लग्नाच्या उंबरठ्यावर असणारे तरुण - तरुणी निर्जन अश्या बेटावर अचानक येतात . ते आदल्या दिवशी रात्रीपर्यंत त्यांच्या घरात असणारे ते दोघे आलेल्या परिस्थितीचा कसा सामना करतात हे वाचणे खूप रोमहर्षक वाटते .  या निर्जन बेटावर पशु - प्राणी , साधा कीटक सुद्धा नसतो तिथे एक म्हातारा माणूस जादुमयरित्या  येऊन त्या दोघांना त्या बेटावरून बाहेर पडण्यासाठी प्रणयाचा मार्ग सुचवतो . आपापल्या सोबत्यासोबत प्रामाणिक असणारे ते दोघे या गोष्टीला विरोध करून बाहेर पाडण्यासाठी दुसरा मार्ग शोधायचा खुप प्रयत्न करतात . या प्रसंगाला लेखकाने तरुण - तरुणीच्या मनातील विचाराचे वादळ, भिती खूप परिणामकारक मांडले आहे . आपल्या प्रियकरासोबत भावी आयुष्याची स्वप्ने बघताना अचानक निर्जन बेटावर अनोळखी व्यक्ती बरोबर प्रणय करायचा विचा...