मुख्य सामग्रीवर वगळा

पुस्तक समीक्षा - बेटावरचे ते दोघे

 

पुस्तक समीक्षा १/५/२/२६ 

पुस्तकाचे नाव - बेटावरचे ते दोघे 

लेखक - समर 

बेटावरचे ते दोघे या पुस्तकात मुख्यतः दोन कथा आहेत .

१. बेटावरचे ते दोघे (Fantasy Fiction - कल्पनारम्य / जादुई कथा )

२. स्मृतिविप्लव (Science Fiction - विज्ञान कथा)

पहिली कथा आपल्याला कल्पनेच्या जगात नेते. लग्नाच्या उंबरठ्यावर असणारे तरुण - तरुणी निर्जन अश्या बेटावर अचानक येतात . ते आदल्या दिवशी रात्रीपर्यंत त्यांच्या घरात असणारे ते दोघे आलेल्या परिस्थितीचा कसा सामना करतात हे वाचणे खूप रोमहर्षक वाटते . 

या निर्जन बेटावर पशु - प्राणी , साधा कीटक सुद्धा नसतो तिथे एक म्हातारा माणूस जादुमयरित्या  येऊन त्या दोघांना त्या बेटावरून बाहेर पडण्यासाठी प्रणयाचा मार्ग सुचवतो . आपापल्या सोबत्यासोबत प्रामाणिक असणारे ते दोघे या गोष्टीला विरोध करून बाहेर पाडण्यासाठी दुसरा मार्ग शोधायचा खुप प्रयत्न करतात . या प्रसंगाला लेखकाने तरुण - तरुणीच्या मनातील विचाराचे वादळ, भिती खूप परिणामकारक मांडले आहे . आपल्या प्रियकरासोबत भावी आयुष्याची स्वप्ने बघताना अचानक निर्जन बेटावर अनोळखी व्यक्ती बरोबर प्रणय करायचा विचार दोघांना अस्वस्थ करतो पण बाहेर पडण्याचा कोणताच मार्ग नसल्यामुळे ते दोघे तो मार्ग निवडतात पण ते त्या बेटावरून बाहेर पडत नाहीत . कथा इथेच संपते . कथा पूर्ण झाल्यावर सुद्धा कथेचा शेवट अपूर्ण वाटतो . खुप गडबडीत कथा संपवली असे वाटते .

दुसरी कथा ही विज्ञान वर आधारित आहे . कथेच्या सुरुवातीलाच 'लीना' नावाच्या मुलीच दहशतवादी अपहरण करतात. "बैतीस्तान" या देशात "विसलोहत" ही मूलतत्त्ववादी संघटना तरुण मुला - मुलींचे अपहरण करून आधुनिक तंत्राद्वारे त्यांची स्मृती नष्ट करून त्यांच्या मनात दहशतवादी विचार रुजवण्याचे काम करत असे .

दहशतवाद्यांच्या भडक भाषणाने प्रेरित होऊन स्वतः हुन दहशतवादी बनलेला "नोवाल" नावाचा तरुण दहशतवादी लीना च्या प्रेमात पडतो . तिच्यावर शस्रक्रिया करून तिची स्मृती नष्ट होऊ नये असे त्याला खुप वाटे पण तो काहीच करू शकत नाही. स्वतःची ओळख विसरलेल्या लीनाला नोवाल जगणं शिकवतो . दरम्यान अमेरिकन सैन्याने केलेल्या दहशतवादविरोधी कारवाई मध्ये हे दोघे इतर दहशतवादी बरोबर पकडले जातात  . अमेरिकन सैन्य त्यांच्यावर उपचार करून त्यांना घरी पाठवतात , परंतु ते घरी गेले तरी दहशतवाद त्यांचा पाठलाग सोडत नाही. दहशतवाद्यांनी केलेल्या शस्त्रक्रियेच्या वेळी या तरुणांच्या मेंदूत एक चिप बसवलेली असते . त्या चिप चा वापर करून दहशतवाद्यां पर्यंत पोहचण्याचा सैन्याचा मनसुबा होता पण यातच लीनासह बाकीच्या तरुणांचा शेवट होतो आणि भयानक बॉम्ब स्फोटाने सारा देश हादरतो.

दहशतवादी विचार , संघटना , त्यात फुलणारे प्रेम आणि त्या सर्व गोष्टींचा होणारा शेवट लेखकाने उत्तमरीत्या मांडला आहे . वाईट गोष्टींचा शेवट हा नेहमी भयानकच असतो.

काल्पनिक प्रेम कथा आवडणाऱ्यांनी हे पुस्तक जरूर वाचावे .


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुस्तक समीक्षा - ३/१८/२/२६- लमाण

पुस्तक समीक्षा - ३/१७/२/२६ पुस्तकाचे नाव - लमाण  लेखक - डॉक्टर . श्रीराम लागू  प्रकाशक - @popularprakashan  गेल्या काही दिवसापूर्वी लमाण वाचुन पूर्ण झाले. हे केवळ एक पुस्तक नसुन  डॉ.श्रीराम लागू यांनी आपल्या आयुष्याचा विस्तृत जीवनपट वाचकासमोर ठेवलेला आहे. पुस्तक वाचतांना तो डोळ्यासमोरून झरझर निघुन जातो.  आम्ही नट म्हणजे नुसते लमाण. इकडचा माल तिकडे नेऊन टाकणारे' हे शिरवाडकरांचे वाक्य पुस्तकाच्या सुरुवातीलाच वाचायला मिळते.  आपल्या एवढ्या दीर्घ आयुष्यात श्रीराम लागूंनी बरेच काही करुन ठेवले आहे.  मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतला, मराठी रंगमंचावरचा एक नट हा लागूंचा फक्त एक चेहरा झाला. यापलिकडे एक सशक्त निर्माता व दिग्दर्शक, एक चांगला वाचक व अभ्यासक, प्रायोगिक रंगभूमीवरचा एक प्रज्ञावंत कलाकार आणि सामाजिक तळमळ असलेला एक सच्चा माणूस असे लागूंचे अनेक चेहरे 'लमाण' वाचल्यानंतर ध्यानात येतात.  हे पुस्तक श्रीराम लागू यांनी दोन भागात मांडले आहे. १.त्यांचे वैयक्तिक आयुष्य, शिक्षण, डॉक्टरकीचा व्यवसाय आणि नाटकप्रेम.  २.व्यावसायिक रंगभूमीवरचे आयुष्य. सुरुवातीच्या ...

पुस्तकाचे नाव - "कितने गाजी आए कितने गाजी गए" (Kitne Ghazi Aaye Kitne Ghazi Gaye)

  पुस्तकाचे नाव -  "कितने गाजी आए कितने गाजी गए"  ( Kitne Ghazi Aaye Kitne Ghazi Gaye) Life Story of  Lt Gen . K . J . S . "Tiny " Dhillon (Retd ) किंमत - ४३८ रुपये  'Kitne Ghazi Aaye, Kitne Ghazi Gaye' (कितने गाज़ी आए, कितने गाज़ी गए) हे Lt Gen . K . J . S . "Tiny " Dhillon (Retd ) यांच्या आत्मचरित्रावर आधारित पुस्तक आहे, ज्यात त्यांच्या काश्मीरमधील ४० वर्षांच्या कारकिर्दीतील दहशतवादविरोधी संघर्ष,  कश्मीरी पंडितांचे स्थलांतर त्यामागील सत्य आणि  गैरसमज स्पष्ट केले आहेत.   पुलवामा हल्ला -  ४० सीआरपीएफ जवानांच्या शहीद होण्यामागील घटनांची माहिती ,  बालाकोट हवाई हल्ल्याचे  तपशील,  कलम ३७०  हटवल्यानंतर काश्मीरमधील सामाजिक, राजकीय आणि कायद्याच्या परिस्थितीवर झालेला परिणाम हे मुद्दे मांडले आहेत . त्यांचा नॅशनल डिफेन्स अकॅडेमी (NDA ) मधून सुरु झालेला प्रवास, राजपुताना रायफल्स मधील दिवस , General Bipin Rawat Sir , Mahendra Singh Dhoni यांच्याबद्दल या व्यक्तिचरित्रात लिहलं आहे . तसेच हे पुस्तक सैन्यातील सैनिकाच्या वैयक्तिक, व्य...

बेडसे लेणी....कलंदर कलाकारांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीचा रसरशीत अविष्कार.

बेडसे लेणी.... कलंदर कलाकारांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीचा रसरशीत अविष्कार. बेडसे लेणी म्हणजे खरच   कलंदर कलाकारांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीचा रसरशीत अविष्कार. अतिशय सुंदर आणि रेखीव लेणी बघुन मनाला खुप छान वाटत।  पुणे- मुंबई महामार्गावरील कामशेतहून पवना धरणाकडे  बेडसे  हे छोटे  गाव लागते.   नेहमीच्या सहलींच्या वर्दळीपासून दूर एकांतात पहूडलेलं हे बौध्दकालीन लेणं कामशेतपासून जवळच ८-१० कि.मी. अंतरावर आहे. कामशेत रेल्वे स्टेशनपासून पुणे-मुंबई रस्त्यावर आल्यावर एस.टी. किंवा खाजगी वाहनाने पवनानगर(काळे कॉलनी) येथे जाणार्‍या रस्त्याने राऊतवाडी येथे उतरावे. डोंगराच्या मध्यावर असलेली बेडसे लेणी लक्ष वेधून घेतात. अत्यंत शांत सुरम्य निवांत असं हे ठिकाण. येथुन मावळ खोर्‍याचे विस्तीर्ण दर्शन होते. आकाशात घुसलेली तुंग, तिकोना किल्ल्यांची शिखरे साद घालतात. कलंदर कलाकारांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीचा रसरशीत अविष्कार इथं पहायला मिळतो. इ.स. पूर्व २०० ते ५०० च्या काळातील हे शिल्प सौंदर्य आहे. आम्ही आमच्या ऑफिस ट्रीप ला  पवना धरण बघायला गेलो होतो आणि अचा...