मुख्य सामग्रीवर वगळा

पुस्तकाचे नाव - "कितने गाजी आए कितने गाजी गए" (Kitne Ghazi Aaye Kitne Ghazi Gaye)

 


पुस्तकाचे नाव - "कितने गाजी आए कितने गाजी गए" (Kitne Ghazi Aaye Kitne Ghazi Gaye)

Life Story of Lt Gen . K . J . S . "Tiny " Dhillon (Retd )

किंमत - ४३८ रुपये 

'Kitne Ghazi Aaye, Kitne Ghazi Gaye' (कितने गाज़ी आए, कितने गाज़ी गए) हे Lt Gen . K . J . S . "Tiny " Dhillon (Retd ) यांच्या आत्मचरित्रावर आधारित पुस्तक आहे, ज्यात त्यांच्या काश्मीरमधील ४० वर्षांच्या कारकिर्दीतील दहशतवादविरोधी संघर्ष, कश्मीरी पंडितांचे स्थलांतर त्यामागील सत्य आणि गैरसमज स्पष्ट केले आहेत. पुलवामा हल्ला - ४० सीआरपीएफ जवानांच्या शहीद होण्यामागील घटनांची माहिती , बालाकोट हवाई हल्ल्याचे तपशील, कलम ३७० हटवल्यानंतर काश्मीरमधील सामाजिक, राजकीय आणि कायद्याच्या परिस्थितीवर झालेला परिणाम हे मुद्दे मांडले आहेत .

त्यांचा नॅशनल डिफेन्स अकॅडेमी (NDA ) मधून सुरु झालेला प्रवास, राजपुताना रायफल्स मधील दिवस , General Bipin Rawat Sir , Mahendra Singh Dhoni यांच्याबद्दल या व्यक्तिचरित्रात लिहलं आहे .

तसेच हे पुस्तक सैन्यातील सैनिकाच्या वैयक्तिक, व्यावसायिक आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कौटुंबिक जीवनावर लक्ष केंद्रित करते.

प्रत्येकाने वाचावे असे पुस्तक .



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुस्तक समीक्षा - ३/१८/२/२६- लमाण

पुस्तक समीक्षा - ३/१७/२/२६ पुस्तकाचे नाव - लमाण  लेखक - डॉक्टर . श्रीराम लागू  प्रकाशक - @popularprakashan  गेल्या काही दिवसापूर्वी लमाण वाचुन पूर्ण झाले. हे केवळ एक पुस्तक नसुन  डॉ.श्रीराम लागू यांनी आपल्या आयुष्याचा विस्तृत जीवनपट वाचकासमोर ठेवलेला आहे. पुस्तक वाचतांना तो डोळ्यासमोरून झरझर निघुन जातो.  आम्ही नट म्हणजे नुसते लमाण. इकडचा माल तिकडे नेऊन टाकणारे' हे शिरवाडकरांचे वाक्य पुस्तकाच्या सुरुवातीलाच वाचायला मिळते.  आपल्या एवढ्या दीर्घ आयुष्यात श्रीराम लागूंनी बरेच काही करुन ठेवले आहे.  मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतला, मराठी रंगमंचावरचा एक नट हा लागूंचा फक्त एक चेहरा झाला. यापलिकडे एक सशक्त निर्माता व दिग्दर्शक, एक चांगला वाचक व अभ्यासक, प्रायोगिक रंगभूमीवरचा एक प्रज्ञावंत कलाकार आणि सामाजिक तळमळ असलेला एक सच्चा माणूस असे लागूंचे अनेक चेहरे 'लमाण' वाचल्यानंतर ध्यानात येतात.  हे पुस्तक श्रीराम लागू यांनी दोन भागात मांडले आहे. १.त्यांचे वैयक्तिक आयुष्य, शिक्षण, डॉक्टरकीचा व्यवसाय आणि नाटकप्रेम.  २.व्यावसायिक रंगभूमीवरचे आयुष्य. सुरुवातीच्या ...

बेडसे लेणी....कलंदर कलाकारांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीचा रसरशीत अविष्कार.

बेडसे लेणी.... कलंदर कलाकारांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीचा रसरशीत अविष्कार. बेडसे लेणी म्हणजे खरच   कलंदर कलाकारांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीचा रसरशीत अविष्कार. अतिशय सुंदर आणि रेखीव लेणी बघुन मनाला खुप छान वाटत।  पुणे- मुंबई महामार्गावरील कामशेतहून पवना धरणाकडे  बेडसे  हे छोटे  गाव लागते.   नेहमीच्या सहलींच्या वर्दळीपासून दूर एकांतात पहूडलेलं हे बौध्दकालीन लेणं कामशेतपासून जवळच ८-१० कि.मी. अंतरावर आहे. कामशेत रेल्वे स्टेशनपासून पुणे-मुंबई रस्त्यावर आल्यावर एस.टी. किंवा खाजगी वाहनाने पवनानगर(काळे कॉलनी) येथे जाणार्‍या रस्त्याने राऊतवाडी येथे उतरावे. डोंगराच्या मध्यावर असलेली बेडसे लेणी लक्ष वेधून घेतात. अत्यंत शांत सुरम्य निवांत असं हे ठिकाण. येथुन मावळ खोर्‍याचे विस्तीर्ण दर्शन होते. आकाशात घुसलेली तुंग, तिकोना किल्ल्यांची शिखरे साद घालतात. कलंदर कलाकारांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीचा रसरशीत अविष्कार इथं पहायला मिळतो. इ.स. पूर्व २०० ते ५०० च्या काळातील हे शिल्प सौंदर्य आहे. आम्ही आमच्या ऑफिस ट्रीप ला  पवना धरण बघायला गेलो होतो आणि अचा...