मुख्य सामग्रीवर वगळा

पुस्तकाचे नाव - दास डोंगरी राहतो


पुस्तकाचे नाव - दास डोंगरी राहतो 

लेखक - गोपाल नीलकंठ दांडेकर (गो . नी . दांडेकर )

प्रकाशक - मृण्मयी प्रकाशन 

किंमत - रुपये- ३७५/-

पाने - २९७

"शुभमंगल सावधान " असं भटजी नी म्हणल्यावर ज्यांनी बोहल्यावरून धुम ठोकली होती ते रामदास स्वामी , ज्यांनी मनाचे श्लोक लिहले ते रामदास स्वामी असं लहानपणापासून ऐकलं होत पण रामदास स्वामी हे त्यापेक्षा मोठे आणि अनंतापर्यंत आहेत . 

दास डोंगरी राहतो हे श्री समर्थ रामदास स्वामी यांचे चरित्र सांगणारी ही कादंबरी गो.नि. दांडेकर यांनी लिहिलेली आहे. श्रीसमर्थ रामदासाचं चरित्र सांगणारी ही रसाळ कादंबरी आहे. 

नारायण हे मूळ नाव  आणि जांब (जिल्हा - जालना) हे मूळ गाव .  रामरायाच्या ओढीसाठी लग्नाच्या मंडपातून धुम ठोकुन थेट नाशिक गाठलं आणि तिथेच काही काळ वास्तव्य केल. नारायणाचे रामदासस्वामी झाले. 

धर्मशाळेत राहणं, माधुकरी मागणं, प्राचीन ग्रंथांचं वाचन असं वेगळं जीवन सुरु झालं.  मुलांबरोबर हास्यविनोद, यतींसमवेत शास्त्रचर्चा, मुनींशी परमार्थचिंतन, एकांतात रघुवीरस्मरण असा दिनक्रम सुरु झाला. विरक्त आयुष्य जगणाऱ्या रामदासस्वामीनी देशाच्या संसाराची चिंता वाहिली. दासबोधसारख्या ग्रंथाची देणगी दिली. 

स्वामींचे वाचन अफाट, अनेक स्मृती ग्रंथ , धर्म शास्त्र , ऐतरेयोपनिषद (उपनिषदे ), रामायणाचे बालकांड आणि बरेच साहित्य त्यांनी वाचले याची ओळख गो . नी . दांडेकर वाचकाला वेगवेगळ्या प्रसंगातून करून देतात.  

रामदास स्वामींचा प्रवास नाशकातुन नंतर हिमालयात आणि परत सह्याद्री , सगळा देश पायी पालथा घातला . लोकांची सुख , दुःख अगदी जवळून पहिली . 

वाई ला कृंष्णामाईच्या घाटावर तरुणांना एकत्र करून जी बलोपासना त्यांनी सुरु केली आणि सूर्यनमस्कारचे महत्व मुलांना पटवुन देण्यासाठी ते ११०० सूर्यनमस्कार घालत याच वर्णन वाचुन खुप प्रेरणा मिळते. 

११ रुद्र मारुती, चाफळ चे श्रीरामांचे मंदिर यांची स्थापना रामदास स्वामींनी केली . या सर्व प्रसंगाचे वर्णन इतक्या सुंदर पद्धतीने केले आहे की वाचकाला आपल्याजवळ स्वामी असल्यासारखे वाटते . छत्रपती शिवाजी महाराज यांची आणि रामदास स्वामींची भेट वाचुन अंगावर शहरा उभारतो . अफजल खानाच्या भेटीवेळी रामदास स्वामींची अस्वस्थता अतिशय अचुक शब्दात मांडली गेली आहे. 

या साऱ्याची कथा पुन्हा पुन्हा वाचावी अशी !

पण या पुस्तकाचा शेवट वाचताना मात्र अजुन रामदास स्वामी बद्दल जाणुन घ्यायची इच्छा होते, त्यांच्या आयुष्याचा उत्तरार्थ पुस्तकात मांडला नाही त्यामुळे पुस्तक वाचुन पण संपूर्ण समाधान मिळत नाही . 

हे पुस्तक amazon वर उपलब्ध आहे .  मी सांगलीमध्ये "ताम्हणकर बुक शॉपी " मधुन घेतलंय . 

@readersbookcafe 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुस्तक समीक्षा - ३/१८/२/२६- लमाण

पुस्तक समीक्षा - ३/१७/२/२६ पुस्तकाचे नाव - लमाण  लेखक - डॉक्टर . श्रीराम लागू  प्रकाशक - @popularprakashan  गेल्या काही दिवसापूर्वी लमाण वाचुन पूर्ण झाले. हे केवळ एक पुस्तक नसुन  डॉ.श्रीराम लागू यांनी आपल्या आयुष्याचा विस्तृत जीवनपट वाचकासमोर ठेवलेला आहे. पुस्तक वाचतांना तो डोळ्यासमोरून झरझर निघुन जातो.  आम्ही नट म्हणजे नुसते लमाण. इकडचा माल तिकडे नेऊन टाकणारे' हे शिरवाडकरांचे वाक्य पुस्तकाच्या सुरुवातीलाच वाचायला मिळते.  आपल्या एवढ्या दीर्घ आयुष्यात श्रीराम लागूंनी बरेच काही करुन ठेवले आहे.  मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतला, मराठी रंगमंचावरचा एक नट हा लागूंचा फक्त एक चेहरा झाला. यापलिकडे एक सशक्त निर्माता व दिग्दर्शक, एक चांगला वाचक व अभ्यासक, प्रायोगिक रंगभूमीवरचा एक प्रज्ञावंत कलाकार आणि सामाजिक तळमळ असलेला एक सच्चा माणूस असे लागूंचे अनेक चेहरे 'लमाण' वाचल्यानंतर ध्यानात येतात.  हे पुस्तक श्रीराम लागू यांनी दोन भागात मांडले आहे. १.त्यांचे वैयक्तिक आयुष्य, शिक्षण, डॉक्टरकीचा व्यवसाय आणि नाटकप्रेम.  २.व्यावसायिक रंगभूमीवरचे आयुष्य. सुरुवातीच्या ...

पुस्तकाचे नाव - "कितने गाजी आए कितने गाजी गए" (Kitne Ghazi Aaye Kitne Ghazi Gaye)

  पुस्तकाचे नाव -  "कितने गाजी आए कितने गाजी गए"  ( Kitne Ghazi Aaye Kitne Ghazi Gaye) Life Story of  Lt Gen . K . J . S . "Tiny " Dhillon (Retd ) किंमत - ४३८ रुपये  'Kitne Ghazi Aaye, Kitne Ghazi Gaye' (कितने गाज़ी आए, कितने गाज़ी गए) हे Lt Gen . K . J . S . "Tiny " Dhillon (Retd ) यांच्या आत्मचरित्रावर आधारित पुस्तक आहे, ज्यात त्यांच्या काश्मीरमधील ४० वर्षांच्या कारकिर्दीतील दहशतवादविरोधी संघर्ष,  कश्मीरी पंडितांचे स्थलांतर त्यामागील सत्य आणि  गैरसमज स्पष्ट केले आहेत.   पुलवामा हल्ला -  ४० सीआरपीएफ जवानांच्या शहीद होण्यामागील घटनांची माहिती ,  बालाकोट हवाई हल्ल्याचे  तपशील,  कलम ३७०  हटवल्यानंतर काश्मीरमधील सामाजिक, राजकीय आणि कायद्याच्या परिस्थितीवर झालेला परिणाम हे मुद्दे मांडले आहेत . त्यांचा नॅशनल डिफेन्स अकॅडेमी (NDA ) मधून सुरु झालेला प्रवास, राजपुताना रायफल्स मधील दिवस , General Bipin Rawat Sir , Mahendra Singh Dhoni यांच्याबद्दल या व्यक्तिचरित्रात लिहलं आहे . तसेच हे पुस्तक सैन्यातील सैनिकाच्या वैयक्तिक, व्य...

बेडसे लेणी....कलंदर कलाकारांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीचा रसरशीत अविष्कार.

बेडसे लेणी.... कलंदर कलाकारांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीचा रसरशीत अविष्कार. बेडसे लेणी म्हणजे खरच   कलंदर कलाकारांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीचा रसरशीत अविष्कार. अतिशय सुंदर आणि रेखीव लेणी बघुन मनाला खुप छान वाटत।  पुणे- मुंबई महामार्गावरील कामशेतहून पवना धरणाकडे  बेडसे  हे छोटे  गाव लागते.   नेहमीच्या सहलींच्या वर्दळीपासून दूर एकांतात पहूडलेलं हे बौध्दकालीन लेणं कामशेतपासून जवळच ८-१० कि.मी. अंतरावर आहे. कामशेत रेल्वे स्टेशनपासून पुणे-मुंबई रस्त्यावर आल्यावर एस.टी. किंवा खाजगी वाहनाने पवनानगर(काळे कॉलनी) येथे जाणार्‍या रस्त्याने राऊतवाडी येथे उतरावे. डोंगराच्या मध्यावर असलेली बेडसे लेणी लक्ष वेधून घेतात. अत्यंत शांत सुरम्य निवांत असं हे ठिकाण. येथुन मावळ खोर्‍याचे विस्तीर्ण दर्शन होते. आकाशात घुसलेली तुंग, तिकोना किल्ल्यांची शिखरे साद घालतात. कलंदर कलाकारांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीचा रसरशीत अविष्कार इथं पहायला मिळतो. इ.स. पूर्व २०० ते ५०० च्या काळातील हे शिल्प सौंदर्य आहे. आम्ही आमच्या ऑफिस ट्रीप ला  पवना धरण बघायला गेलो होतो आणि अचा...