पुस्तकाचे नाव - सत्तरीचे बोल लेखक- डॉ. पी. एस. रामाणी जगातील सर्वोत्तम दहा न्यूरोस्पायनल सर्जना पैकी एक डॉ. पी. एस. रामाणी . गोव्यातील एका खेडेगावात वाढलेले आणि अपार कष्ट , सातत्य याने यशाला गवसणी घालणारे डॉ. रामाणी यांनी लिहलेले "सत्तरीचे बोल" हे पुस्तक सत्तरीत असणाऱ्या साठीच नव्हे तर आताच्या धकाधकीच्या जीवनात तिशी चाळिशीत लागू होण्यासारखे आहे. अलीकडे आपण रोज बातम्या ऐकतो तरुणांना तिशीतच हार्ट अटॅक , मधुमेह , उच्च रक्तदाब या सारखे आजार जडतात. याच मूळ कारण रोजच्या सवयींमध्ये असतं. डॉ. रामाणी म्हणतात शरीर संवर्धनासाठी वेळीच लक्ष दिल तर साठीतही माणसाचा पाठीचा कणा ताठ राहु शकतो . साठीच वय नाठीच नसून तल्लख बुद्धीच द्योतक असत. आपल्याला जीवनावर प्रेम करायला हे पुस्तक शिकवत. डॉ. रामाणी एके ठिकाणी म्हणतात, आपल्याला हे जीवन न मागता मिळालेले आहे. पुस्तकात एके ठिकाणी मनाच्या हिमतीबद्दल सांगताना ते लोकमान्य टिळकांचं उदाहरण देतात. इंग्लंड मध्ये चिरोल खटला हरल्यानंतर कुणीतरी त्यांना बोललं, आता सार आभाळ कोसळलं. टिळक शांतपणे त्यावर उत्तरले, हरकत नाही त्या कोसळल...
पुस्तकाचे नाव - "कितने गाजी आए कितने गाजी गए" ( Kitne Ghazi Aaye Kitne Ghazi Gaye) Life Story of Lt Gen . K . J . S . "Tiny " Dhillon (Retd ) किंमत - ४३८ रुपये 'Kitne Ghazi Aaye, Kitne Ghazi Gaye' (कितने गाज़ी आए, कितने गाज़ी गए) हे Lt Gen . K . J . S . "Tiny " Dhillon (Retd ) यांच्या आत्मचरित्रावर आधारित पुस्तक आहे, ज्यात त्यांच्या काश्मीरमधील ४० वर्षांच्या कारकिर्दीतील दहशतवादविरोधी संघर्ष, कश्मीरी पंडितांचे स्थलांतर त्यामागील सत्य आणि गैरसमज स्पष्ट केले आहेत. पुलवामा हल्ला - ४० सीआरपीएफ जवानांच्या शहीद होण्यामागील घटनांची माहिती , बालाकोट हवाई हल्ल्याचे तपशील, कलम ३७० हटवल्यानंतर काश्मीरमधील सामाजिक, राजकीय आणि कायद्याच्या परिस्थितीवर झालेला परिणाम हे मुद्दे मांडले आहेत . त्यांचा नॅशनल डिफेन्स अकॅडेमी (NDA ) मधून सुरु झालेला प्रवास, राजपुताना रायफल्स मधील दिवस , General Bipin Rawat Sir , Mahendra Singh Dhoni यांच्याबद्दल या व्यक्तिचरित्रात लिहलं आहे . तसेच हे पुस्तक सैन्यातील सैनिकाच्या वैयक्तिक, व्य...