मंगळवार, १० जुलै, २०१८

नयनरम्य गगनबावडा

नयनरम्य गगनबावडा

गगनबावडा !!! नावला शोभेल अस गगनात मावेल एवढे सौन्दर्य. 

पावसाळ्याला नुकतीच सुरुवात झाली असल्यामुळे निसर्ग कसा प्रसन्न आणि हिरवागार झाला आहे. मी स्वता: भटकंती वेडी असल्यामुळे वातावरणात घरात काही माझे पाय  शांत बसु देत न्हवते. पण जायच कुठे?? ठिकाण शक्यतो जवळ पाहिजे म्हणजे एका दिवसाच ट्रेकिंग व्हाव. 
मग बरेच पर्याय बघून कोल्हापुर पासून एकदम जवळ असे निसर्गरम्य गगनबावडा हे ठिकान नक्की केले. 

जायचे कसे:
गगनबावडा हे कोल्हापुर पासून एकदम जवळ.
कोल्हापुर मधून ST बस च्या भरपूर गाड्या आहेत. रंकाला बस स्टॅंड वरुन बस सुटतात।

कोल्हापुर पासून गगनबावडा 58 किमी अंतर आहे.

पहायचे काय:
नीरव शांतता , रान वेली , झाडे , प्राणी , उंच डोंगर , खोल दरया , नागमोडी घाट , डोंगरातले शुभ्र धबधबे।
मनसोक्त भटकंती ज्याला करायची आहे त्याने अवश्य इकडे यावे. 
गगनगिरी महाराजांचा मठ बघण्यासारखा आहे. 

आम्ही रविवार , १ जुलाई २०१८ ला जायच नक्की केले. 
रंकाला बस स्टॅंड वरुन कोल्हापुर-गगनबावडा बस पकडली।  चला या वर्षीच्या भटकंती ला सुरुवात झाली. 
गणपती बप्पा मोरया!!!

सकाळी ९. १५ च्या बस ने जवळ पास १०. ४५ ला आम्ही गगनबावडा मधे पोहचलो. थंड गार हवा होती।  पण मधेच ऊन - पावुस चा खेळ चालू होता. 






























आम्हाला गगनबावडा बस स्टॅंड पासून गगनगिरी महाराजांच्या मठा कड़े जायचे होते. चौकशी केली तर समजल १ ते १. ५  किमी अन्तर आहे मग आम्ही चालत जायच ठरवल।  कारण वडाप ने जाण्यापेक्षा चालत जाण्यात खुप मजा होती.

वाटेत खुप सारी फणसाची झाडे , नारळ , सुपारीची झाडे , रानफूले , अलुची पाने होती.

सुपारीची झाडे:






































फणसाने लगडलेले झाड़ :
(शेमबड़ा आणि कापा असे फणसाचे प्रकार असतात , हा बहुतेक शेमबड़ा असावा. कापा फणस खाण्यास छान.)






































राणवांग सारखा एक छोटास झाड : याच्या पानाला काटे होते.






































मठाकाडे जाताना रस्ता हिरव्यागर्द झाडीने , छोट्या छोट्या धबधब्याने सजलेला होता. खोल दर्या , त्यातून घोंगावणारा वारा असे प्रसन्न वातावरण होते. मनाला खुप सुखवत होते सगळे काही।  

रस्ता कच्चा असला तरी चांगला होता. म्हणजे ज्याना पायी चालत जाणे जमणार नाही त्याना काळजी करायची गरज नाही कारण गाड्या, बस गडाच्या पायथ्याशी जातात आणि तिथुन पायऱ्यावरून वरती जाता येते. पायऱ्या थोड्या खड्या आहेत त्यामुळे चालताना काळजी घ्यावी लागते।  पावसाळ्यात तर त्या जास्त निसरड्या होतात.







पावुस कमी असल्यामुळे निसर्ग मनभरुन बघता येत होता.  नजर जाईल तिकडे हिरवाई , वारा , मस्त वाटत होत।


घाटातून जाणारा रस्ता:



घोरपडीचे पिल्लू :






























डोंगरातून आलेला धबधबा :


दुरून दिसणारा गगनगड (गगनगिरी महाराजांचा गड):



वरती होटल ची सोय नाही पण रोज दुपारी १. ५० वाजता महाप्रसाद असतो।  गरम गरम भात, वरण, तिखट सुखी भाजी आणि गोड शिरा।  या अश्या वातावरणात हा प्रसाद म्हणजे वर्णणीच।


उभा खडक :






























प्रवेशद्वार श्री क्षेत्र गगनगिरी महाराज आश्रम - गगनगड:


मठाकाडे जाताना:





































गडावर खुप सारी माकडे आहेत त्यामुळे आपली बैग , मोबाइल स्वतच जपायचा।



वरती मठाचे फोटोज घेण्यासाठी परवानगी नसल्यामुळे ते फोटोज अंतरजलावरून देत आहे. 
दूसर म्हणजे एवढी माकडे आहेत अजिबात फोटोज काढून देत नाहीत. 

मुख्य मठापासून वरती गेले की "ध्यान मंदीर" आहे. एकदम प्रसन्न आणि शांत वाटते. 


आम्ही थोड़ा वेळ मठात बसून नंतर महाप्रसाद घेतला. आणि परत येण्यास निघालो. येताना आम्ही सोबत आणलेल्या आणि तिथल्या वातावरणात बनवलेल्या ओल्या भेळेवर ताव मारला।


साधारण २-३ तास गडावर घालवून आम्ही परतीचा मार्ग पकडला।  परत त्याच रस्त्याने रमत गमत। अशी ही आमची छोटी पण मस्त सहल झाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा