मंगळवार, ३ जुलै, २०१८

म...... म...... मराठीचा......

म...... म...... मराठीचा...... 



५ जुलै २०१८ माझी लेक ३ वर्षाची होतेय।  साहजिकच आम्ही आता तिच्या वाढत्या आणि खेलत्या वयाबरोबर तिच्या शिक्षणाचा श्रीगणेशा करायची वेळ. आम्ही तिला या वर्षापासून शाळेत घालायचा निर्णय घेतला. 

आमची इच्छा की तिचे प्राथमिक  शिक्षण मराठी माध्यमातून व्हावे आणि माफक अपेक्षा होती की अशी शाळा असावी जिथे छान छान गाणी , श्लोक , अंकगणित ओळख  , खेळणे , बागडने अस  प्राथमिक शिकवले जाईल।  मग १ - २  दिवस ऑफिस मधुन सुट्टी घेवून या मायभूमित मराठी शाळा शोधण्याचा आम्ही घाट घातला।

सुरुवातीला आम्हाला जास्त करुन इंग्रजी माध्यमाच्या शाळा दिसु लागल्या. आता जागतिकीकरणाने जग एवढे जवळ आले आहे की दूसरी भाषा शिकणे गरजेचे बनले आहे. असो, आम्ही आमचा शोध चालूच ठेवला  होता. जवळपास दिवस संपत आला तरी काही मराठी बालवाड़ी सापडत नव्हती।  जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत पण त्या पहिलीपासून।  मग आम्ही विचार केला चला इंग्रजी माध्यमाच्या शाळा मधे सेमी - इंग्रजी हा प्रकार आहे तो तरी बघू या. अस म्हणुन आम्ही एका शाळेत गेलो।  शाळा बघितली तर अगग काय तो थाट , काय ती रंगबेरंगी चित्र , छान छान नटलेल्या बाई (Teacher ), खुप सारी खेळणी. एका शाळेत तर आम्ही या ३ वर्ष्याच्या चिमुरड्यासाठी व्यायामशाला (जिम) बघितली।  आता सांगा ही छोटी छोटी बाळ ज्याना अजुन शी - शु करताना आई लागतेच ते व्यायामशाळेत जावून काय मेहनत करणार आहेत.

बाई आम्ही गेल्या गेल्या माझ्या लेकिला म्हणाल्या , Hi, Good Afternoon Beta, How are you?? You want to play with toys??
माझी लेक मला चिकटून बसली आणि अस काही सांगत होती , आई अग कोण आहेत या आणि कोणत्या भाषेत बोलतयात माझ्याशी।  बिचार बाळ गांगारुन गेल होत.

एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत तर लहान गटासाठी (Nursery) माझ्या समोर तर\७-८ इंग्रजी विषयाची पुस्तके आणून ठेवली आणि सांगितल की हा तुमच्या बेबी चा अभ्यासक्रम आणि ३ सत्रात परीक्षा पण होईल तिची. ।  बाप रे मला तर सगळ गोल गोल फिरतय काय अस वाटु लागल. ज्या मुलीचे वय प्राथमिक शिक्षणाचे आहे, जे आपण हसत खेळत शाळेत देवू शकतो त्याला एवढा अभ्यासक्रम। CBSE ची तयारी बालवाड़ी मधे!!!

अस सगळ वातावरण झाल आहे आणि या इंग्रजी माध्यमाच्या धुक्यामधे माझ मराठी माध्यम कुठे हरवून गेल होत। 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा