गुरुवार, १६ जून, २०१६

बेडसे लेणी....कलंदर कलाकारांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीचा रसरशीत अविष्कार.

बेडसे लेणी....कलंदर कलाकारांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीचा रसरशीत अविष्कार.

बेडसे लेणी म्हणजे खरच  कलंदर कलाकारांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीचा रसरशीत अविष्कार. अतिशय सुंदर आणि रेखीव लेणी बघुन मनाला खुप छान वाटत। 

पुणे- मुंबई महामार्गावरील कामशेतहून पवना धरणाकडे बेडसे हे छोटे  गाव लागते.  नेहमीच्या सहलींच्या वर्दळीपासून दूर एकांतात पहूडलेलं हे बौध्दकालीन लेणं कामशेतपासून जवळच ८-१० कि.मी. अंतरावर आहे. कामशेत रेल्वे स्टेशनपासून पुणे-मुंबई रस्त्यावर आल्यावर एस.टी. किंवा खाजगी वाहनाने पवनानगर(काळे कॉलनी) येथे जाणार्‍या रस्त्याने राऊतवाडी येथे उतरावे.
डोंगराच्या मध्यावर असलेली बेडसे लेणी लक्ष वेधून घेतात. अत्यंत शांत सुरम्य निवांत असं हे ठिकाण. येथुन मावळ खोर्‍याचे विस्तीर्ण दर्शन होते. आकाशात घुसलेली तुंग, तिकोना किल्ल्यांची शिखरे साद घालतात.
कलंदर कलाकारांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीचा रसरशीत अविष्कार इथं पहायला मिळतो. इ.स. पूर्व २०० ते ५०० च्या काळातील हे शिल्प सौंदर्य आहे.

आम्ही आमच्या ऑफिस ट्रीप ला  पवना धरण बघायला गेलो होतो आणि अचानक तेथुनच बेडसे लेणी ला जायचा प्लान ठरला। खरच अप्रतिम अशी लेणी आहेत। 

पवना धरण : इथूनच पुट्ठे बेडसे लेण्याकडे जाता येते।


पावसाळा असल्यामुळे निसर्ग खुलला होता। सगळे डोंगर कसे हिरवा शालू नेसून बसले होते. 



लेन्या जवळ असणारी छोटी घरे 


एक आजीबाई एवढ्या पावसात आणि जोरदार वाऱ्यात छत्री संभाळायची कसरत करत होत्या. :)




लेन्या च्या बाजूचा परिसर।  पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे सगळीकडे हिरवल पसरली होती. 

लेण्याजवळून दिसणारी आजुबाजूची शेती आणि परिसर।



लेण्याचा एक अविष्कार :



प्रवेशद्वार ;-




घोडयावर स्वार स्त्री -पुरुष यांचे कोरीव मूर्ती काम :-


लेणी :


सुमारे १५० मीटर लांबीच्या दगडात लेण्यांचा गट खोदला गेला आहे. येथे एक चैत्यगृह काही विहार, खोदीव स्तूप, आणि पाण्याची कुंडे आहेत. हे आद्य कोरीव काम इसवीसन पूर्व पहिल्या शतकातील आहे असे मानले जाते. या लेण्यांना मारकूड असे नाव प्राचीनकाळी होते असे येथील शिलालेखात कोरलेले दिसते. भारत सरकारने या लेणीला दिनांक २६ मे, इ.स. १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे (विकिपीडिया वरुन साभार )






येथील चैत्यगृह भव्य आहे. याची उंची सुमारे २८ फूट आहे. समोरील भागात चार खांबांवर आधारित व्हरांडा आहे. बाजूच्या भिंतींमध्ये खोल्या आहेत. यांच्यामागे खोलवर कोरलेले चैत्यगृह आहे.


चैत्यगृहा समोर मध्यभागी चार खांब आहेत. यातील दोन पूर्ण आणि बाजूला दोन अर्धव्यक्त आहेत. यांची रचना अशी अहे की त्यामुळे या खांबांनी हा तीस फूट लांब आणि १२ फूट रूंदीचा व्हरांडा तोलून धरला आहे असे दिसते. हे खांब लेण्यांच्या पायापासून थेट छतापर्यंत जातात. चैत्यगृहात हर्मिकेचा चौथरा आहे. त्यावर ते मोठे घट कोरलेले आहेत. या घटातून अष्टकोनी खांब बाहेर पडलेले दिसतात. याच खांबांच्या शिरोभागी जमिनीच्या दिशेने उमललेल्या कमळाची रचना केलेली आहे. त्यावर एक चौरंग कोरलेला आहे. छताकडे एकदा हर्मिकेच्या चौथऱ्यावर हत्तीघोडाबैल या पशूंवर स्वार स्त्री-पुरुषांच्या जोड्या दिसून येतात. अतिशय रेखीव, प्रमाणबद्ध आणि सुंदर असे हे शिल्पकाम केले दिसते. त्यांचे सौष्ठव, डोळ्यातील सौंदर्य, अंगावरील मोजकेच पण उठावदार दागिने, आगळी वेशभूषा हे बेडसे येथील वैशिष्ट्यच आहे. या खांबांच्या शीर्षभागावर उमलत्या कमळाचे कोरीवकाम आहे. यातील प्रत्येक दल हे स्वतंत्र अगदी त्याच्या त्या मधल्या फुगीर शिरेसह दाखवलेले दिसते. येथे कोरलेल्या हत्तींना सुळे दिसत नाहीत. त्याजागी खोबणी केलेल्या दिसून येतात. त्यावरून तिथे खरे हस्तीदंत बसविले जात असावेत असा अंदाज करता येतो. व्हरांड्याच्या अन्य भागावर चैत्यकमानी, वेदिकापट्टींचे नक्षीकाम केलेले आहे. (विकिपीडिया वरुन साभार )

खुप पावुस असल्यामुळे फोटो क्लियर आले नाहीत। 


बेडसे लेण्याजवळ पवना धरण , पवना हूट्स (कृषि पर्यटन ), तुंग, तिकोना किल्ल्ला बघायला आहे। 

बराच वेळ तिथे घालवल्यावर अंधार होण्या अगोदर पुण्याला परत येणे गरजेचे होते म्हणून मनाला मुरड़ घालून तिथल्या निसर्गाला निरोप दिला। 


मनात मात्र परत एकदा अशाच ट्रिप चे नियोजन चालू होते.  परत एकदा मस्त आणि चिंब भिजायला। 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा