मंगळवार, ३१ डिसेंबर, २०१३

साखलोली अविस्मरणीय सहल। ........ 

 एक सुंदर सफ़र .... 

जायचे कसे :
पुणे - कात्रज - भोर - महड - दापोली - मुरुड - साखलोली।


पहायचे काय :

मुरुड बीच , हर्णे बंदर , कर्दे बीच आणि कोकणातील रम्य सृष्टि। .....

२३ नवम्बर २०१३ रोजी सकाळी ६.०० वाजता आमची सवारी पुण्यातून निघाली. सकाळची थंड हवा आणि मनातली खुप दिवसाची इच्छा घेवून आम्ही कोकणाकडे प्रस्थान केले 
सकाळी ६. ०० वाजता साळुंखे विहार वरुन मी आणि हणमंत निघालो।  हणमंत चा मित्र अनिल आणि त्याची बायको अमिता आम्हाला घ्यायला आले होते।  मस्त अशी सहल चालू झाली। साळुंखे विहार वरुन निघालो ते सरळ चिंचवड ला. तेथून मनिषा ला घेवून कात्रज मार्गे पुण्यातून बाहेर पडलो।  आमच्या गाडीला भुकेची जाणीव झाली  होती आणी मग काय सुरू झाली पेट्रोल शोधायची मोहीम।  चिंचवड मधून बाहेर पडल्यापासून आम्ही सगळे पंप शोधत होतो पन तो काही सापडायला तयार नव्हता।  शेवटी अस वाटायला लागल की आता आपल्याला गाड़ी थांबवून पायपीठ करायला लागते की काय। ……। पण कात्रज च्या नवीन बोगदयातून बाहेर पडल्यावर शिंदेवाड़ी च्या जवळ एक पेट्रोल पंप दिसला आणि जीवत जिव आला।  आमच्या गाडीला भरपूर खायला घालून आमच्या गाडीने कोकणाकडे आगेकूच केली। 


सातारा रोड़ ला सरळ जावून भोरला जाण्यासाठी उजवी कड़े वळलो आणि खरया अर्थाने आमच्या सहलीची सुरूवात झाली। दोन्हीं बाजूला मस्त हिरवीगार झाडी आणि कच्चा रस्ता , सकाळची थंड हवा। खुप अलहदायक वातावरण होते। आता गाडीची भुक भागवल्या नंतर आमच्या पोटात थंडी ने कावळे ओरडायला लागले होते।  मग अनिल ने गाड़ी एक मस्त अशा टपरी वर थांबवली।  ओहह। ....... काय थंड हवा होती। 


लगेच सगळे सोबत आणलेल्या भाता वर तुटून पडलो। …। अह्ह्ह्ह काय मस्त भात बनवलेला होता अमिताने।  एकदम दक्षिण भारतीय पद्धत अणि सोबत मी बनवलेली लापाशि।  मस्त अशी पेटपूजा झाली। 
लगेच मी , मनीषा आणि अमिता ने फोटोसेशन सुरु केल।  हणमंत होताच फोटोग्राफर म्हणुन :)
अजुन खुप दूर जायच आहे लगेच अनिलचा गाडीतून आवाज आला आणि मग आम्ही आमचे फोटोसेशन उरकत घेतल।

रस्त्याला जाताना उजवीकडे भाटघर धरण लागल। मग दोन्ही बाजुला हिरवीगार झाड़ आणि आजूबाजूला असलेला सुंदर निसर्ग।

श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे,
क्षंणात येते सर सर शिरवे क्षंणात फिरुनि ऊन पडे

या बालकवी च्या कवितेची प्रचिती येत होती।

भाटघर धरण :-



भाटघर धरण ओलांडून आम्ही पुढे आलो. रस्त्यातच आम्हाला एक नदी लागली।  कन्याकुमारी ला जसे तिन्ही महासागराचे पानी एकत्र आल्यावर सुध्धा आपले एक वेगळेपण ठेवते त्याप्रमाणे या नदीचे होते।  एकच पानी असून सुध्धा तीन वेगवेगळे रंग दिसत होते।  सकाळची वेळ असल्यामुळे उन्हाची सुंदर अशी लकेर पाण्यावर उमटली होती। खुपच सुंदर आणि विहंगम दृश होते।  डोळ्यांचे पारणे फिटले।



 नदीवरचा पुल 

आमची सवारी

गणपती बप्पा पन आमच्याबरोबर सहलीला निघाले....... अगदी आरामात बसुन :)



रस्त्यालाच एक बस थांबा लागला आणि कॅमेरा मधून तो क्लिक केला…… असच।

कोकणातले वळणादार रस्ते… एखाद्या नागमोडया नदी सारखे....


रस्त्यातच दोन मुली बस ची वाट पाहत असलेल्या दिसल्या

अशी मजल करत शेवटी आम्ही वनराईत पोहचलो

 हा सागरी किनारा……… ओला सुंगंध वारा। ………।



 हम पांच। ………




 किनारयावर एक खेकडा सापडला आणि हणमंत ने तो लगेच कॅमेरात क्लिक केला  :)

समुद्रात वल्हावणारी बनाना बोट आम्हाला राइड साठी खुनवत होती।
 आणि आम्ही लगेच तयारपण झालो।
 लगेच बोटीवर स्वार आणि आम्ही निघालो मोहिमेवर।  छत्रपति शिवाजी महाराज की जय !!!!
मावळत्या दिनकरा तुला शतकोटी प्रणाम


दुसरा दिवस :

सकाळी लवकर उठुन मी , मनीषा आणि हणमंत मॉर्निंग वॉक घ्यायला निघालो।  थंडगार हवा सुटली हओ खुप मस्त वाटत होत।  कोकणातील सकाळ खुप प्रसन्न असते अस आतापर्यंत ऐकल होत आज अनुभवत होते। आम्ही ज्या आमराई मध्ये राहिलो त्या काकानी तिथे लावलेल्या झाडाबद्दल माहिती दिली।   तिकडे झाडे लावण्याची पद्धत खुपच वेगळी आहे।  कदाचित तिकडे पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे असेल।


आमराई बघत असताना आम्हाला एक मोगैम्बो पान सापडले।  बाप रे केवढ मोठ पान होत ते।


तिथून जवळच आम्ही चालत गेलो।  सकाळीच हनुमानचे दर्शन झाले।  बजरंगबली की जय।

जवळच असलेली एक उर्दु शाळा। परिसर एकदम स्वच्छ आणि सुंदर होता।

आम्ही जिकडे राहिलो होतो त्या ठिकाणी अशे कैन ठेवले होते , अगोदर समाजलच नाही की ते का आणि कशासाठी नंतर कळल की कोकणात बारा महीने पाण्याची टंचाई असते म्हणून अशी सॊय केली असते पानी भरण्यासाठी। १५० रुपये ५०० लिटर पाण्यासाठी मोजावे लागतात।  एवढा मोठा विशाल महासागर जवळ असताना पाण्यासाठी असलेले त्यांचे हाल पाहून खुप वाईट वाटल।  पुण्या - मुंबई सारख्या शहरात राहणारी आमच्यासारखी माणस रोज हजारो लिटर पाणी असच वाया घालवात असतो।  कधी कळणार ????


एक घर असच नारळाच्या शोभेत दिमाखात उभे होत, मला फ़ोटो काढायचा मोह नाही आवरता आला। 
(कधीतरी मोह असलेला चांगला असतो ). :) :)


आमराई तुन आम्ही प्रस्थान केल ते थेट साखलोली च्या दिशेने (आमचा मुख्य ध्येय )....
साखलोली च्या अलीकडेच एक सुंदर असा ओढा लागला। अनिल ला मग गाड़ी थांबवावी लागली मग काय आम्ही सगळे पटकन गाडीतून उड्या मारल्या
खुपच सुंदर असा ओढ़ा होता।  झ़रण्या सारखे पाणी वाहत होते।
आमचे मॉडेलिंग सुरु झाले। …। मुली म्हणल्यावर दुसर काय ?????

साखलोली शेवटी आम्ही पोहचलो।  कोकणाची पुरेपूर ओळख दाखवत समोरची पायवाट आम्हाला खुणावत होती।  दगडाची रचना केलेली भिंत , लाल माती नारळ , पोफळीच्या बागा , फुलझाड़े मन कस आनंदून गेल। 




साखलोली आम्ही ज्या अस्वले काकाच्या घरी गेलो होतो ते एक ग्रेट कलाकार होते।  त्यांची स्वताची खुप मोठी नर्सरी तर होतीच पण छंद म्हणून ते लाकड़ापासून वेळ मिळेल तसे वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तु बनवायचे।  त्यातलेच काही फ़ोटो इकडे टाकत आहे 
लाकडाचे हरिण :











लाकडाचे टी- पॉय आणि त्यावर कोरलेला सुंदर बदक :
 

बाबुपासून बनवलेला पेन स्टॅंड :


लाकडाचा पक्षी :
लाकडाचा पक्षी :
लाकडाचा अजुन एक कलाकृति :
लाकडाचा अजुन एक कलाकृति :

लाकडाचा पक्षी :


तिथे असलेली बंदुक पाहून आम्ही लगेच शिकारीला निघालो। 
बिचारा अनिल। ………… नहीं मुझे मत मारो, मैं मेरा खुन नहीं दुंगा। …………



फुलनदेवी  …… हाहाहा। …… :) :)


पक्ष्यांसाठी पाणी ठेवलेले
 नारळ - पोफळीच्या बागा 

सुपारी ची झाड़ 

 नारळ बाजारात न विकता ते खाली पडल्यावर नवीन रोपे रुजवून बाजारात विकुन जास्त फायदा मिलवता येतो 

स्विमींग टैंक , रेन डान्स


 झाड़ू ज्या पासून बनवला जातो ते झाड़ 
मिरी  चे झाड़
 मनी प्लाँट (बाप रे एवढे मोढ़ )
 करदली सारख वाटणार एक सुंदर झाड़ 





सगळी निसर्ग सृष्टि ची मुक्त उधळून बघुन मन तृप्त झाल होत , तिथुन अजिबात निघाव वाटत न्हवते पन घड्याळ खुनवत होत।  आम्हाला निघाव लागल।  येताना खेड - पोलादपुर - महाबळेश्वर मार्गे पुण्यात यायचे ठरले। पन पन। …………अजुन एक ग़ोष्ट मात्र राहिली होती।  काय ??? काय बरे ??? 

अजुन मासे खाले न्हवते। ....... कोकणात गेला आणि मासे खाले नाही तर मग कशाला गेला होता अशी गत झाली।  मग खेड मधे आल्यावर मस्त माशयावर ताव मारला। 

आता महाबळेश्वर। ....... वेन्ना लेक। 


नंतर Mapro गार्डन मध्ये आइसक्रीम खावून पुण्याचा रस्ता पकडला।  खरच खुप छान अशी सहल झाली। 
निसर्गाच्या जवळ जायला पाहिजे तो न मागता भरपूर काही देत असतो। 

आम्ही परत आलो होतो हे खर पन तयार झालो होतो अजुन एका प्रवासासाठी 

मनमुराद जगण्यासाठी।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा