मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जुलै, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पुस्तकाचे नाव - सत्तरीचे बोल

पुस्तकाचे नाव - सत्तरीचे बोल  लेखक- डॉ. पी. एस. रामाणी  जगातील सर्वोत्तम दहा न्यूरोस्पायनल सर्जना पैकी एक डॉ. पी. एस. रामाणी . गोव्यातील एका खेडेगावात वाढलेले आणि अपार कष्ट , सातत्य याने यशाला गवसणी घालणारे  डॉ. रामाणी यांनी लिहलेले "सत्तरीचे बोल" हे पुस्तक सत्तरीत असणाऱ्या साठीच नव्हे तर आताच्या धकाधकीच्या जीवनात तिशी चाळिशीत लागू होण्यासारखे आहे. अलीकडे आपण रोज बातम्या ऐकतो तरुणांना तिशीतच हार्ट अटॅक , मधुमेह , उच्च रक्तदाब या सारखे आजार जडतात. याच मूळ कारण रोजच्या सवयींमध्ये असतं.  डॉ. रामाणी म्हणतात शरीर संवर्धनासाठी वेळीच लक्ष दिल तर साठीतही माणसाचा पाठीचा कणा ताठ राहु शकतो . साठीच वय नाठीच नसून तल्लख बुद्धीच द्योतक असत.  आपल्याला जीवनावर प्रेम करायला हे पुस्तक शिकवत.  डॉ. रामाणी एके ठिकाणी म्हणतात, आपल्याला हे जीवन न मागता मिळालेले आहे. पुस्तकात एके ठिकाणी मनाच्या हिमतीबद्दल सांगताना ते लोकमान्य टिळकांचं उदाहरण देतात. इंग्लंड मध्ये  चिरोल खटला हरल्यानंतर कुणीतरी त्यांना बोललं, आता सार आभाळ कोसळलं. टिळक शांतपणे त्यावर उत्तरले, हरकत नाही त्या कोसळल...