म...... म...... मराठीचा...... ५ जुलै २०१८ माझी लेक ३ वर्षाची होतेय। साहजिकच आम्ही आता तिच्या वाढत्या आणि खेलत्या वयाबरोबर तिच्या शिक्षणाचा श्रीगणेशा करायची वेळ. आम्ही तिला या वर्षापासून शाळेत घालायचा निर्णय घेतला. आमची इच्छा की तिचे प्राथमिक शिक्षण मराठी माध्यमातून व्हावे आणि माफक अपेक्षा होती की अशी शाळा असावी जिथे छान छान गाणी , श्लोक , अंकगणित ओळख , खेळणे , बागडने अस प्राथमिक शिकवले जाईल। मग १ - २ दिवस ऑफिस मधुन सुट्टी घेवून या मायभूमित मराठी शाळा शोधण्याचा आम्ही घाट घातला। सुरुवातीला आम्हाला जास्त करुन इंग्रजी माध्यमाच्या शाळा दिसु लागल्या. आता जागतिकीकरणाने जग एवढे जवळ आले आहे की दूसरी भाषा शिकणे गरजेचे बनले आहे. असो, आम्ही आमचा शोध चालूच ठेवला होता. जवळपास दिवस संपत आला तरी काही मराठी बालवाड़ी सापडत नव्हती। जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत पण त्या पहिलीपासून। मग आम्ही विचार केला चला इंग्रजी माध्यमाच्या शाळा मधे सेमी - इंग्रजी हा प्रकार आहे तो तरी बघू या. अस म्हणुन आम्ही एका शाळेत गेलो। शाळा...