मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

2026 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पुस्तकाचे नाव - "कितने गाजी आए कितने गाजी गए" (Kitne Ghazi Aaye Kitne Ghazi Gaye)

  पुस्तकाचे नाव -  "कितने गाजी आए कितने गाजी गए"  ( Kitne Ghazi Aaye Kitne Ghazi Gaye) Life Story of  Lt Gen . K . J . S . "Tiny " Dhillon (Retd ) किंमत - ४३८ रुपये  'Kitne Ghazi Aaye, Kitne Ghazi Gaye' (कितने गाज़ी आए, कितने गाज़ी गए) हे Lt Gen . K . J . S . "Tiny " Dhillon (Retd ) यांच्या आत्मचरित्रावर आधारित पुस्तक आहे, ज्यात त्यांच्या काश्मीरमधील ४० वर्षांच्या कारकिर्दीतील दहशतवादविरोधी संघर्ष,  कश्मीरी पंडितांचे स्थलांतर त्यामागील सत्य आणि  गैरसमज स्पष्ट केले आहेत.   पुलवामा हल्ला -  ४० सीआरपीएफ जवानांच्या शहीद होण्यामागील घटनांची माहिती ,  बालाकोट हवाई हल्ल्याचे  तपशील,  कलम ३७०  हटवल्यानंतर काश्मीरमधील सामाजिक, राजकीय आणि कायद्याच्या परिस्थितीवर झालेला परिणाम हे मुद्दे मांडले आहेत . त्यांचा नॅशनल डिफेन्स अकॅडेमी (NDA ) मधून सुरु झालेला प्रवास, राजपुताना रायफल्स मधील दिवस , General Bipin Rawat Sir , Mahendra Singh Dhoni यांच्याबद्दल या व्यक्तिचरित्रात लिहलं आहे . तसेच हे पुस्तक सैन्यातील सैनिकाच्या वैयक्तिक, व्य...

पुस्तकाचे नाव - दास डोंगरी राहतो

पुस्तकाचे नाव - दास डोंगरी राहतो  लेखक - गोपाल नीलकंठ दांडेकर (गो . नी . दांडेकर ) प्रकाशक - मृण्मयी प्रकाशन  किंमत - रुपये- ३७५/- पाने - २९७ "शुभमंगल सावधान " असं भटजी नी म्हणल्यावर ज्यांनी बोहल्यावरून धुम ठोकली होती ते रामदास स्वामी , ज्यांनी मनाचे श्लोक लिहले ते रामदास स्वामी असं लहानपणापासून ऐकलं होत पण रामदास स्वामी हे त्यापेक्षा मोठे आणि अनंतापर्यंत आहेत .  दास डोंगरी राहतो हे  श्री समर्थ रामदास स्वामी यांचे चरित्र सांगणारी ही कादंबरी गो.नि. दांडेकर यांनी लिहिलेली आहे.  श्रीसमर्थ रामदासाचं चरित्र सांगणारी ही रसाळ कादंबरी आहे.  नारायण हे मूळ नाव  आणि जांब (जिल्हा - जालना) हे मूळ गाव .  रामरायाच्या ओढीसाठी लग्नाच्या मंडपातून धुम ठोकुन थेट नाशिक गाठलं आणि तिथेच काही काळ वास्तव्य केल.  नारायणाचे रामदासस्वामी झाले.  धर्मशाळेत राहणं, माधुकरी मागणं, प्राचीन ग्रंथांचं वाचन असं वेगळं जीवन सुरु झालं.  मुलांबरोबर हास्यविनोद, यतींसमवेत शास्त्रचर्चा, मुनींशी परमार्थचिंतन, एकांतात रघुवीरस्मरण असा दिनक्रम सुरु झाला. विरक्त आयुष्य जगणाऱ्या रा...

पुस्तक समीक्षा - बेटावरचे ते दोघे

  पुस्तक समीक्षा १/५/२/२६  पुस्तकाचे नाव - बेटावरचे ते दोघे  लेखक - समर  बेटावरचे ते दोघे या पुस्तकात मुख्यतः दोन कथा आहेत . १. बेटावरचे ते दोघे (Fantasy Fiction - कल्पनारम्य / जादुई कथा ) २. स्मृतिविप्लव (Science Fiction - विज्ञान कथा) पहिली कथा आपल्याला कल्पनेच्या जगात नेते. लग्नाच्या उंबरठ्यावर असणारे तरुण - तरुणी निर्जन अश्या बेटावर अचानक येतात . ते आदल्या दिवशी रात्रीपर्यंत त्यांच्या घरात असणारे ते दोघे आलेल्या परिस्थितीचा कसा सामना करतात हे वाचणे खूप रोमहर्षक वाटते .  या निर्जन बेटावर पशु - प्राणी , साधा कीटक सुद्धा नसतो तिथे एक म्हातारा माणूस जादुमयरित्या  येऊन त्या दोघांना त्या बेटावरून बाहेर पडण्यासाठी प्रणयाचा मार्ग सुचवतो . आपापल्या सोबत्यासोबत प्रामाणिक असणारे ते दोघे या गोष्टीला विरोध करून बाहेर पाडण्यासाठी दुसरा मार्ग शोधायचा खुप प्रयत्न करतात . या प्रसंगाला लेखकाने तरुण - तरुणीच्या मनातील विचाराचे वादळ, भिती खूप परिणामकारक मांडले आहे . आपल्या प्रियकरासोबत भावी आयुष्याची स्वप्ने बघताना अचानक निर्जन बेटावर अनोळखी व्यक्ती बरोबर प्रणय करायचा विचा...

पुस्तक समीक्षा - अजुनी यौवनात मी

  पुस्तक समीक्षा - २/११/२/२६-   पुस्तकाचे नाव - अजुनी यौवनात मी लेखक - प्र . य . अत्रे  प्रकाशक - नारायण पोतदार , ५१० सदाशिव पेठ , ज्ञान प्रबोधिनी भवन पुणे . "अजुनी यौवनात मी" या पुस्तकात १६ वेगवेगळ्या कथा आहेत . अगदी मिश्किल हलक्या फुलक्या कथा खूप उत्तम प्रकारे मनोरंजन करतात. या कथांची सुबोध लेखन शैली , मिस्कील निवेदन पद्धती , विसंगती आणि वैचित्त्याचा शोध यामुळे कथा खूप वेगळ्या वाटतात . आपल्या नजरेला मिश्किलतेचा चष्मा लावून खेळकर दृष्टीने जीवनाकडे बघायला या कथा शिकवतात . कथेला आकस्मिक कलाटणी देण्याच्या लेखकाच्या तंत्रामुळे कथा खूपच भावते . धावपळीच्या जगात आपल्याला हसवणारा आणि मनावरचा ताण हलका करून जीवनाकडे वेगळा दृष्टिकोन देणाऱ्या या कथा जरूर वाचाव्या अशा आहेत. अधिक माहितीसाठी visit Insta @readersbookcafe 

पुस्तक समीक्षा - ३/१८/२/२६- लमाण

पुस्तक समीक्षा - ३/१७/२/२६ पुस्तकाचे नाव - लमाण  लेखक - डॉक्टर . श्रीराम लागू  प्रकाशक - @popularprakashan  गेल्या काही दिवसापूर्वी लमाण वाचुन पूर्ण झाले. हे केवळ एक पुस्तक नसुन  डॉ.श्रीराम लागू यांनी आपल्या आयुष्याचा विस्तृत जीवनपट वाचकासमोर ठेवलेला आहे. पुस्तक वाचतांना तो डोळ्यासमोरून झरझर निघुन जातो.  आम्ही नट म्हणजे नुसते लमाण. इकडचा माल तिकडे नेऊन टाकणारे' हे शिरवाडकरांचे वाक्य पुस्तकाच्या सुरुवातीलाच वाचायला मिळते.  आपल्या एवढ्या दीर्घ आयुष्यात श्रीराम लागूंनी बरेच काही करुन ठेवले आहे.  मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतला, मराठी रंगमंचावरचा एक नट हा लागूंचा फक्त एक चेहरा झाला. यापलिकडे एक सशक्त निर्माता व दिग्दर्शक, एक चांगला वाचक व अभ्यासक, प्रायोगिक रंगभूमीवरचा एक प्रज्ञावंत कलाकार आणि सामाजिक तळमळ असलेला एक सच्चा माणूस असे लागूंचे अनेक चेहरे 'लमाण' वाचल्यानंतर ध्यानात येतात.  हे पुस्तक श्रीराम लागू यांनी दोन भागात मांडले आहे. १.त्यांचे वैयक्तिक आयुष्य, शिक्षण, डॉक्टरकीचा व्यवसाय आणि नाटकप्रेम.  २.व्यावसायिक रंगभूमीवरचे आयुष्य. सुरुवातीच्या ...