नयनरम्य गगनबावडा गगनबावडा !!! नावला शोभेल अस गगनात मावेल एवढे सौन्दर्य. पावसाळ्याला नुकतीच सुरुवात झाली असल्यामुळे निसर्ग कसा प्रसन्न आणि हिरवागार झाला आहे. मी स्वता: भटकंती वेडी असल्यामुळे वातावरणात घरात काही माझे पाय शांत बसु देत न्हवते. पण जायच कुठे?? ठिकाण शक्यतो जवळ पाहिजे म्हणजे एका दिवसाच ट्रेकिंग व्हाव. मग बरेच पर्याय बघून कोल्हापुर पासून एकदम जवळ असे निसर्गरम्य गगनबावडा हे ठिकान नक्की केले. जायचे कसे: गगनबावडा हे कोल्हापुर पासून एकदम जवळ. कोल्हापुर मधून ST बस च्या भरपूर गाड्या आहेत. रंकाला बस स्टॅंड वरुन बस सुटतात। कोल्हापुर पासून गगनबावडा 58 किमी अंतर आहे. पहायचे काय: नीरव शांतता , रान वेली , झाडे , प्राणी , उंच डोंगर , खोल दरया , नागमोडी घाट , डोंगरातले शुभ्र धबधबे। मनसोक्त भटकंती ज्याला करायची आहे त्याने अवश्य इकडे यावे. गगनगिरी महाराजांचा मठ बघण्यासारखा आहे. आम्ही रविवार , १ जुलाई २०१८ ला जायच नक्की केले. रंकाला बस स्टॅंड वरुन कोल्हापुर-गगनबावडा बस पकडली। चला या वर्षीच्या भटकंती ला सु...