साखलोली अविस्मरणीय सहल। ........ एक सुंदर सफ़र .... जायचे कसे : पुणे - कात्रज - भोर - महड - दापोली - मुरुड - साखलोली। पहायचे काय : मुरुड बीच , हर्णे बंदर , कर्दे बीच आणि कोकणातील रम्य सृष्टि। ..... २३ नवम्बर २०१३ रोजी सकाळी ६.०० वाजता आमची सवारी पुण्यातून निघाली. सकाळची थंड हवा आणि मनातली खुप दिवसाची इच्छा घेवून आम्ही कोकणाकडे प्रस्थान केले सकाळी ६. ०० वाजता साळुंखे विहार वरुन मी आणि हणमंत निघालो। हणमंत चा मित्र अनिल आणि त्याची बायको अमिता आम्हाला घ्यायला आले होते। मस्त अशी सहल चालू झाली। साळुंखे विहार वरुन निघालो ते सरळ चिंचवड ला. तेथून मनिषा ला घेवून कात्रज मार्गे पुण्यातून बाहेर पडलो। आमच्या गाडीला भुकेची जाणीव झाली होती आणी मग काय सुरू झाली पेट्रोल शोधायची मोहीम। चिंचवड मधून बाहेर पडल्यापासून आम्ही सगळे पंप शोधत होतो पन तो काही सापडायला तयार नव्हता। शेवटी अस वाटायला लागल की आता आपल्याला गाड़ी थांबवून पायपीठ करायला लागते की काय। ……। पण कात्रज च्या नवीन बोगदयातून बाहेर पडल्यावर शिंदेवाड़ी च्या जवळ एक पेट...